मराठी नव वर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा Marathi New Year Gudi Padwa 2024
यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ रोजी साजरा होतोय . या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्व सज्ज आहोत .
नव वर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
चित्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ ,नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सूर्य तोच पर्व नवे, शब्द तेच वर्ष नवे, आयुष्य तेच अर्थ नवे, यशाचे सुरु होवो किरण नवे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
आरंभ होई चैत्रमासीचा,गुढ्या तोरणे सण उत्साहाचा कवळ मुखी घालू गोडाचा,साजरा दिन हो गुढीपाडव्याचा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
पुन्हा एक नविन वर्ष ,पुन्हा एक नवी आशा ,तुमच्या कर्तुत्वाला,पुन्हा एक नवी दिशा,नववर्षाभिनंदन गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष ,मनोमनी दाते नवं वर्षाचा हर्ष. हिंदू नवं वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा !
गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास
नवा दिवस नवी सकाळ ,चला एकत्र साजरं करूया.. गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.
नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना… माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने ।
Comments
Post a Comment