सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामधील पर्यटणस्थळे , Sangli District Information .Tourist Places in Sangli
सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचे मुख्य केंद्र सांगली शहर आहे. या जिल्ह्यातील प्रमुख शहरे सांगली, मिरज, उरूण इस्लामपूर , विटा ,जत , तासगाव आहेत. सांगली जिल्ह्यात शेती आणि उद्योग विकासात उत्कृष्ट काम केले जाते. . सांगली मध्ये गणेश उत्सव, तुलजाभवानी यात्रा, आणि खेळ आणि संस्कृतीच्या विविध कार्यक्रम लोकप्रिय आहेत.
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला सांगली हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
शेती -
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळा तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यातल्यात्यात तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत -तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून माणगंगा,मोरणा,वारणा,येरळा,अग्रणी,बोर या जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली येथे धरण असून कुची, अंजनी, भोसे, कोसारी, वज‘चोंडे, रेठरे, आटपाडी इत्यादी लहान-मोठी धरणे आहेत. याशिवाय कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पवन उर्जा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील गुढेपाचगणी व ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत.
बळीराजा धरण हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प खानापूर तालुक्यात येरळा नदीवर उभारण्यात आला आहे. हे छोटे धरण शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व अभियंते यांनी एकत्र येऊन बांधले आहे. शास्त्र ,तंत्रज्ञान, पर्यावरण, पाणी अडवण्याचे व साठवण्याचे पारंपरिक-आधुनिक मार्ग आणि मानवी मूल्ये या सर्व घटकांचा संतुलित विचार हे धरण बांधताना करण्यात आला आहे. प्रामुख्याने बाळावाडी व तांदुळवाडी या खेड्यांच्या परिसरातील सुमारे ९०० एकर जमिनीला या धरणाचा फायदा होतो. ‘छोट्या धरणांतून अधिक विकास’ या चळवळीचे बळीराजा धरण हे एक उत्तम प्रतीक म्हणता येईल.
जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून वर्षात सरासरी ५० ते ७५सेमी एवढा पाऊस जिल्ह्यात पडतो. पश्चिमेकडील शिराळा तालुक्यात जास्त पाऊस पडतो, तर तो पूर्वेकडे कमी होत जातो. मिरज येथे फक्त ६४०मि.मी.एवढाच पडतो. खनिजांचा विचार करता जिल्ह्यात प्रामुख्याने शिराळा तालुक्यात बॉक्साईटचे साठे सापडतात.
उद्योग -
जिल्ह्यात सांगली, मिरज,विटा,कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.
राजकीय संरचना
१. लोकसभा मतदारसंघ :लोकसभा मतदार संघात सांगली, मिरज, पलूस-कडेगांव, खानापूर-आटपाडी ,तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे ६ मतदारसंघ आहेत. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.
२. विधानसभा मतदारसंघ :जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत-मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.
दळणवळण -How to Travel Sangli?
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
सांगली जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे खालील प्रमाणे आहेत .Tourist Places in Sangli District
1) रामलिंग बेट बहे
2) सागरेश्वर अभयारण्य
3) गणपती मंदिर सांगली
4) दंडोबा डोंगर
5) चौरंगिनाथ मंदिर
6 किल्ले मछिंद्रगड
7) मल्लिकार्जुन मंदिर व डोंगर क्षेत्र
Comments
Post a Comment